बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्र सरकारची पशुपालकांसाठी मोठी घोषणा, ‘इतके’ लाख जिंकण्याची संधी

नवी दिल्ली | आज आपल्या देशात सर्वत्र यांत्रिकीकरण झालं आहे. आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हटंल जातं. परिणामी आपल्या देशातील शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. भारतीय शेती प्रामुख्याने आपल्या पशुपालनासाठीसुद्धा ओळखली जात होती. पण आता पशुपालन कमी होताना दिसत आहे.

देशातील वाढते यांत्रिकीकरण हे पशुपालन कमी होण्यास कारणीभूत आहे. देशातील पशुपालन करणाऱ्यांसाठी आता केंद्र सरकार एक चांगली योजना घेऊन आलं आहे. पशुपालनाला प्रोत्साहन मिळावे हा उद्देश या योजनेच्या पाठीमागे आहे. तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांच्या माध्यमातून देशातील पशुपालकांना केंद्र सरकार गुरं आणि जनावरं सांभाळण्यासाठी पाठबळ देणार आहे.

केंद्र सरकार या पुरस्कारांसाठी बक्षीस रूपात खूप मोठी रक्कम देत आहे. पहिल्या क्रमांकासाठी 5 लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी 3 लाख रुपये, तर तिसऱ्या क्रमांकासाठी 2 लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. ही रक्कम थेट पशुपालकांना मिळणार आहे. म्हणून या योजनेसाठी अर्ज करण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे.

दुग्ध व्यवसायात आपलं योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहेत. कृत्रीम गर्भधारणा करणाऱ्या पशुसंस्थानचा सुद्धा या पुरस्कारात समावेश आहे. या योजनेसाठी केंद्रिय डेअरी मंत्रालय अर्ज मागवत आहे. www.dahd.nic.in या लिंकवर जाऊन पशुपालक अर्ज करू शकतात.

थोडक्यात बातम्या 

गरिबांचा मसीहा सोनू सूदच्या घरी आयकर विभागाचा छापा, तब्बल 20 तास केली झाडाझडती

‘देव तारी त्याला कोण मारी’; बसच्या चाकाखाली येऊनही दुचाकीस्वार वाचला, पाहा व्हिडीओ

चीनमध्ये डेल्टाचा धुमाकूळ; देशात पुन्हा दहशतीचं वातावरण

मोठी बातमी! एअर इंडियाला खरेदी करण्यासाठी ‘या’ कंपनीने लावली बोली

टाइम मॅगझिनच्या 100 ‘सर्वात प्रभावशाली लोकांच्या’ यादीत मोदींसह या व्यक्तींचा समावेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More