बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात 64, 425 रूग्ण ठणठणीत होऊन घरी मात्र रूग्णवाढीचा आकडा चिंताजनक

नवी दिल्ली |   देशातली वाढती कोरोनाबाधितांची आकडेवारी चिंतेचा विषय बनली आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्याचं सरकारपुढे मोठं आव्हान आहे. देशात सलग सहाव्या दिवशी सहा हजाराहून अधिक नव्या रूग्णांची नोंद झाल्याने चिंता अधिक वाढली आहे.

दुसरीकडे कोरोनाबाधितांचे आकडे अधिक वाढत असताना अशातून देखील सकारात्मक बातमी पुढे आली आहे. देशात आतापर्यंत 64, 425 कोरोनाबाधित रूग्ण  ठणठणीत होऊन घरी पोहचले आहेत.

देशात मंगळवारी 6387 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातली कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 1 लाख 51 हजार 767 वर जाऊन पोहचला आहे. देशात सध्या 83 हजार रूग्ण अ‌ॅक्टीव्ह आहेत. त्यांच्यावर देशातल्या विविध रूग्णालयांत उपचार सुरू आहेत.

भारतात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण जगभरात सर्वात कमी असून ते 3.3 टक्क्यांवरून 2.87 टक्कय़ांवर आलेले आहे, तर जगभरात मृत्यूचे प्रमाण 6.4 टक्के आहे. रुग्णांचे प्रमाणही अन्य देशांच्या तुलनेत भारतात कमी आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्याचा रुग्ण दुपटीचा कालावधी 14 दिवसांवर आणण्यात ठाकरे सरकारला यश

फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतल्या आकडेवारीवर पृथ्वीराज चव्हाणांचं चॅलेंज, म्हणाले…

महत्वाच्या बातम्या-

संकटात राजकारण करणाऱ्या विरोधकांना जनता रस्त्या

बिनकामी माणसं सरकार पाडण्याचा विचार करतात, पवारांचा फडणवीसांवर निशाणा

नरेंद्र मोदींकडून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंना अभिवादन, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More