बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली | देशभरात सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनामुळे अनेक लोक त्रस्त झाले आहेत. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी आलेला कोरोना हा अतिशय भीषण असल्याच तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची कोरोना चाचणी आज पॉझिटिव्ह आली आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती दिली आहे.

आज संध्याकाळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करुन माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती देत गेल्या दोन-तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रकाश जावडेकर यांच्याबरोबरच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांना दुसऱ्यांदा कोरोना झाल्याची माहिती समोर आली आहे. येडियुरप्पा यांनी ट्विट करून त्यासंदर्भात माहिती दिली आहे. ऑगस्टमध्ये येडियुरप्पा यांना पहिल्यांदा कोरोना झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

थोडक्यात बातम्या –

“…तर कोरोनाची दुसरी लाटही आली नसती आणि लोकांचे जीवही गेले नसते”

बस कंडक्टर महिलेची निर्घृण हत्या; बुलडाण्यातील थरकाप उडवणारी घटना

…अन् स्वप्नांचा क्षणातच चुराडा झाला; नववधूला घरी घेऊन जाताना नवरदेवाचा रस्त्यातच झाला मृत्यू

कोरोनाबाधित आईची एक चुक बेतली तिच्या चिमुकलीच्या जीवावर

देशात कोरोनाचा कहर; अदर पुनावालांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे केली ही विनंती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More