महाराष्ट्र मुंबई

ठाकरे सरकारनं सुरक्षा काढल्यानंतर राणेंना आता थेट मोदी सरकारकडून CISF कवच

नवी दिल्ली | ठाकरे सरकारनं सुरक्षा काढल्यानंतर मोदी सरकारकडून नारायण राणेंना सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्र सरकारने राणेंना Y दर्जाची सुरक्षा दिली आहे.

चंद्रकांत पाटील आणि खासदार नारायण राणे यांची वाय प्लस सुरक्षा दिली जात होती. मात्र काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या नव्या निर्णयानुसार ही सुरक्षा रद्द करण्यात आली होती. ठाकरे सरकारनं सुरक्षा काढल्यानंतर मोदी सरकारकडून नारायण राणेंना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

नारायण राणे यांना केंद्राकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. या सुरक्षेव्यवस्थेनुसार 12 सी. आय. एस. एफचे जवान राणेंच्या सुरक्षा ताफ्यात तैनात असणार आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह इतर भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली होती. यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

थोडक्यात बातम्या-

जो बायडेन यांनी अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ!

धनंजय मुंडेंवरील आरोपांबाबत चौकशी होऊ द्या, ते दोषी आढळल्यास…- शरद पवार

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

राज्यातील ‘इतक्या’ कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला- छगन भुजबळ

दहावी, बारावीच्या परीक्षांसंदर्भात बच्चू कडू यांनी दिली महत्वाची माहिती!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या