ओबीसी आरक्षणाचे तीन तुकडे करणं घातक- छगन भुजबळ

मुंबई | ओबीसी आरक्षणाचे तीन तुकडे करणं हे ओबीसींसाठी घातक आहे, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

ओबीसी आरक्षणाबाबत न्यायमूर्ती रोहिणी आयोग नेमून ओबीसी आरक्षणाचे तीन विभागात विभाजन करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न सुरू आहे, असं भुजबळ म्हणाले आहेत.

त्रिविभाजन झाल्यास सध्या लाभ मिळत नसलेल्या जातींना १० टक्के, अंशतः लाभधारक जातींना १० टक्के तर सर्वाधिक लाभ घेतलेल्या जातींना ७ टक्के आरक्षण मिळू शकतं.

देशात ओबीसी आरक्षणाप्रमाणे इतर आरक्षणाबाबतही असे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-युतीचा मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच; संजय राऊतांचा दावा

-सदाभाऊ खोत म्हणजे कुंभाराकडचं कच्चं मडकं- राजू शेट्टी

-जुन्या नोटा अजूनही बदलून मिळतात का? पुण्यात 1 कोटी 26 हजारांच्या जुन्या नोटा जप्त

-रामदास आठवलेंचा ‘वंचित बहुजन आघाडी’वर धक्कादायक आरोप

-रिंकू राजगुरु मराठीतली सर्वात महागडी अभिनेत्री; ‘मेकअप’साठी घेतले इतके लाख!