Top News महाराष्ट्र मुंबई

रेशनचा काळा बाजार करणाऱ्यांना छगन भुजबळांचा दणका; केली मोठी कारवाई

मुंबई | कोरोनाच्या या कठीण काळात देखील काही रेशन दुकानदार काळाबाजार करत होते. अशा रेशन दुकानदारांवर अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठी कारवाई केली आहे.

नियमांचं पालन न केलेल्या राज्यातील एकूण 39 रेशन दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आलेलं आहेत. 87 रेशन दुकानांचं निलंबन करण्यात आलं आहे, तर एकूण 48 रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.

धान्य कमी देणे, सामान्य माणसाकडून अधिकचे पैसे घेणे किंवा धान्य कमी देऊन धान्याचा साठा करणे, असे प्रकार रेशन दुकानदारांकडून चालू होते. या कारवाई नंतर मात्र त्यांचे चांगलेच धाबे दणादणे आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वितरण व्यवस्था अतिशय महत्त्वाची बनली आहे. अन्न, नागरी पुरवठा विभागाच्यावतीने वितरण व्यवस्थेवर अतिशय सूक्ष्म पद्धतीने लक्ष ठेवले जात आहे. त्यासाठी स्थापन केलेल्या पथकांनीच संबंधित कारवाई केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्याचीच चाल”

महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या 14 वरून 5 वर- राजेश टोपे

महत्वाच्या बातम्या-

केंद्रीय पथकांच्या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करा- उद्धव ठाकरे

गुड न्यूज! देशातील ही तीन राज्ये झाली कोरोनामुक्त

लॉकडाऊनमुळे शिवभोजन थाळीसंदर्भात छगन भुजबळ यांचा मोठा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या