बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मलाही बाळासाहेबांना त्रास द्यायचा नव्हता पण…- छगन भुजबळ

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तुरुंगात न्यायचं नाही, हे आमचं ठरलं होतं. त्यांनी जामीन मागितला तर जामीनला विरोधही करायचा नाही, असा निर्णय झाला होता. पण कोर्टाने जामीन नाकारला, तर मातोश्री जेल म्हणून जाहीर करायचं, हे आम्ही ठरवलं होतं, असा गोप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. ते लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर श्रीकृष्ण आयोगाची अंमलबजावणी करू, असं आम्ही शिवाजी पार्कवर जाहीर केलं होतं. 1993 च्या दंगलीनंतर हा आयोग नेमण्यात आला होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी हा अहवाल फेटाळला होता, असंही भुजबळांनी सांगितलं.

मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे सत्तेत होते, तेव्हा शिवसेनेविरोधातील अनेक फाइल्स बंद केल्या होत्या. मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतो, तेव्हा माझ्यासमोर ती फाइल आली. तेव्हा श्रीकृष्ण आयोगातील अनेक प्रकरणे आली होती. मी ज्या पदावर होतो तेव्हा मला ही कारवाई करावी लागली, असंही त्यांनी सांगितलं.

संजय राऊत माझ्याकडे आले. आमचे बोलणे झाले. मलाही बाळासाहेबांना त्रास द्यायचा नव्हता. पण, निर्णय घेतला नसता तर अडचणीचे झाले असते. म्हणून, मातोश्री’लाच तुरुंग घोषित करण्याची तयारीही केली होती. पण ती वेळ आली नाही, असंही भुजबळांनी सांगितलं.

दरम्यान,

थोडक्यात बातम्या- 

“…त्याहून निराश म्हणजे UN सभेत मोदींच्या भाषणावर कोणीही टाळी वाजवली नाही”

हृदयस्पर्शी! तहानलेल्या कुत्र्याला त्याने ओंजळीने पाणी पाजलं, पाहा व्हिडीओ

‘लोणीचोरी ही कृष्णलीला असेल तर मिठाईचोरी हा गुन्हा कसा?’; न्यायाधिशांचा निकाल चर्चेत

“चंद्रकांत पाटील यांची वेगळीच तऱ्हाय, एकंदरीत सगळीच गंमतय”

एलआयसीच्या ‘या’ स्कीममध्ये एकदाच पैसे भरा अन् महिन्याला मिळवा ‘इतक्या’ हजारांची पेन्शन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More