नाशिक | राज्यात पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. पुण्यात आता निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. तर नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिककरांना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्याची अजिबात इच्छा नाही. त्यामुळे सर्व सामान्यांचे खूप हाल होतात. पण नागरिक निर्बंधाचे पालन करत नसल्याने लॉकडाऊन लागू करण्याची वेळ येऊ शकते, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळांनी शुक्रवारी कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
छगन भुजबळ यांनी नाशिककरांना आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आठ दिवसानंतर मंत्रिमंडळात वस्तुस्थिती मांडणार आहे आणि २ एप्रिल रोजी परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, पुण्यातील कोरोना रूग्णसंख्या पाहता लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना आढावा बैठक पार पडली. यावेळी परिस्थिती गंभीर होत चालली असून ती सुधारली नाही तर कठोर निर्णय घेणार, असा इशारा अजित पवारांनी यावेळी दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
बेअरस्टो, स्टोक्सनं आपल्या दमदार खेळीनं पळवला भारतीय संघाच्या तोंडचा विजयाचा घास
धक्कादायक! बापानेच केलं पोटच्या मुलीसोबत काळीमा फासणारं कृत्य, वाचून तूम्हीही व्हाल सुन्न
नाईट कर्फ्यूच नाही तर ‘या’ जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय
“पुन्हा दिपाली चव्हाण होऊ नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्की न्याय देतील”
जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.