बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रुपाली चाकणकर यांची चित्रा वाघ यांच्यावर घणाघाती टीका, म्हणाल्या…

मुंबई |  गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुणे येथील रघुनाथ कुचिक प्रकरण प्रचंड गाजत आहे. अशातच आता या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. बलात्काराचे आरोप केलेल्या पिडीत तरूणीनं महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना फोन करत मोठा खुलासा केला आहे.

तरूणीनं भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वाघ यांनी कुचिक यांच्यावर कारवाईसाठी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप तरूणीनं केला आहे. त्यानंतर आता चित्रा वाघ मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. या प्रकरणावरून चाकणकर यांनी वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शेवटी दुध का दुध, पाणी का पाणी झालंच. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी घाणेरडं राजकारण करत वाघ यांनी एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, अशी जहरी टीका चाकणकर यांनी केली आहे. पिडीत तरूणीनं फोन करून मला भेटण्याची ईच्छा व्यक्त केली आहे, असं चाकणकर म्हणाल्या आहेत.

दरम्यान, रघुनाथ कुचिक हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यांच्यावर आरोप करत वाघ यांनीच पहिल्यांदा हे प्रकरण बाहेर काढलं होतं. आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाल्यानं वाघ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आयसीयू सेंटरचे भूूमिपूजन होणार!

“प्रकाश आंबेडकरांनी मुलावर कशाप्रकारचे संस्कार केलेत?”

मोदी-बायडन यांच्यात वर्च्युअल बैठक; रशिया-युक्रेन युद्धाबाबत नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य

“लोकांना कायद्यापासून पळू नका म्हणणारेच आता #*# पाय लावून पळतायंत”

पाकच्या नव्या पंतप्रधानांना मोदींनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More