मुंबई | राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. हाडं गोठवणाऱ्या या थंडीनं सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण केलं आहे. ऐन थंडीतही अवकाळी पावसाची हजेरी पहायला मिळत असते. अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचही नुकसान झालं आहे.
सध्या थंडीत कोसळणाऱ्या सरींमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसला आहे. पुढील दोन दिवस खान्देश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात दाट धुक्यासह गारठा कायम राहणार आहे.
21 आणि 22 जानेवारी रोजी संबंधित विभागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं वर्तवलं आहे.
दरम्यान, शनिवारी पुण्यासह मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, अहमदनगर, रत्नागिरी आणि रायगड या अकरा जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
थोडक्यात बातम्या –
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर
अभिनेता विकी कौशलचा 13 वर्षापूर्वीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्याला ओळखणंही झालं कठीण
Pushpa: अभिनेता अल्लू अर्जुन स्वतःच्याच आवाजाच्या प्रेमात, म्हणाला…
Gold Price: सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर
“शाहिस्ते खानाची नुसती बोटंच छाटली होती तुझा पंजाच छाटला जाईल”
Comments are closed.