बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

येत्या काही तासात या ‘6’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; शेतकऱ्यांसाठी खबरदारीच्या सूचना

पुणे | मागील दोन दिवसांपासून राज्यांतील काही भागात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा आसमानी संकट येईल का काय!, अशी शंका उपस्थित केली जात होती. त्यातच आता राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर हवामान खात्याने शेतकऱ्यांना काही शेतीविषयक सुचना देखिल दिल्या आहेत.

रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत येत्या काही तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, अशा सूचना हवामान खात्याने दिल्या आहेत. त्याचबरोबर राज्यात आज पुन्हा एकदा काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात सर्वत्र शेतकऱ्यांनी घेतलेली पिकं काढणीला आली आहेत यावर हवामान खात्याने शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांवर रक्षणासाठी ताडपत्री अथवा प्लॅस्टिकचं आवरण टाकाण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्याला सोमवारी अवकाळी पावसाने झोडपलं होतं. तत्पूर्वी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्येही अवकाळी पाऊस झाला होता.

दरम्यान, मागील 24 तासात राज्यात बुलढाणा 30, चंद्रपूर 12, महाबळेश्वर 20, पुणे 27,  पाषान 22.5, पणजी 11, गोवा व परभणी 6 जालना 3 औरंगाबाद 1.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर महाबळेश्वर, औरंगाबाद ,नागपूर, गोंदिया, पुणे, येथे हलका पाऊस झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव आणि गाफीलपणा भोवला- रघुराम राजन

मोदींचे अनुमोदक छन्नूलाल मिश्रांचा भाजपला विसर, घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

पंढरपूरची निवडणूक पुन्हा घेण्याच्या मागणीवर मोठा खुलासा, राष्ट्रवादी म्हणते ते पत्र खोटं!

रेमडेसिवीर वापराविना 91 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात !

कोरोना संकटात भारताला ‘या’ जवळच्या मित्रदेशाने दिला मदतीचा हात, करणार ही मोठी मदत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More