Top News

चंद्राबाबू नायडू आणि तुमच्यात काय बोलणं झालं?? पवार म्हणतात…

नवी दिल्ली | काल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली.

या भेटीनंतर शरद पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. निकालाआधी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार नाही. सगळेच नेते निकालाची वाट पाहत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

शुक्रवारी नायडूंनी माकप नेते सिताराम येचुरी, काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तर शनिवारी सकाळच्या सत्रात नायडूंनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तर दुपारच्या सत्रात मायावती-अखिलेश यांची भेट घेतली.

आम्हाला पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल, फक्त मोदी शहा ही जोडी सत्तेवर बसता कामा नये, असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे. यामुळे महाआघाडीतल्या पक्षांच्या आणि नेत्यांच्या महत्वकांक्षा साहजिकच वाढल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

-पश्चिम बंगालमध्ये राडा; भाजप कार्यकर्त्यावर धारदार शस्त्राने हल्ला

-पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कार्यकर्त्यांची गुंडगिरी; मतदानापासून नागरिकांना रोखलं!

-धक्कादायक!!! पंजाबमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्याची मतदानाला जाताना हत्या

-उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक प्रकार; मतदानापूर्वी मतदारांच्या बोटाला शाई

-देवाकडे काही मागण्याची माझी वृत्ती नाही- नरेंद्र मोदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या