चंद्रकांत दादांनी चोंबडेपणा करू नये – संजय राऊत
मुंबई | राज्यत सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवरुन वातावरण जोरदार पेटलं आहे. शिवसेना आणि संभाजीराजेंमधील वाद वाढला असल्याचं दिसत आहे. संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. यावरुन आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं.
चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत दादांनी चोंबडेपणा करू नये, हा शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपतींचा अंतर्गत विषय आहे, असं संजय राऊत म्हणाले.
प्रत्येक राजघराण्याचे काही राजकीय लागेबांधे आहेत, हे संबंधच घेऊन पुढं जावं लागतं. इथे व्यक्तिगत काहीच नसतं. चंद्रकांत दादा कोण? ते वंशज आहेत का शिवाजी महाराजांचे? ते कोण ठरवणारे? त्यांनी 2019 साली शब्द कोणी मोडला ते आधी सांगावं, असंही राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना शिवरायांच्या पुतळ्यासमोर उभं करून खरंखोटं करावं, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला होता.
थोडक्यात बातम्या –
‘कशाला तोंड उघडायला लावताय’; संजय राऊतांचा संभाजीराजेंवर हल्लाबोल
Hanuman Chalisa | राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी येणार आमने-सामने
‘या’ तारखेपर्यंत मान्सून राज्यात धडकणार, हवामान खात्याचा अंदाज
विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
नवनीत राणांना अटक करणं भोवणार?; समोर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती
Comments are closed.