Top News

“पवारांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार पाच वर्षं पूर्ण करणार”

औरंगाबाद | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीचं सरकार चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नसल्याचं म्हटलं होतं. याला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. कोणी काहीही बोललं तरी काय होणार नाही, असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे.

औरंगाबादेत राष्ट्रवादीचे पदवीधर उमेदवार सतीश चव्हाण यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी चंद्रकांत खैरे बोलत होते.

शरद पवार यांच्या आशीर्वादाने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जयंत पाटलांनीही चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय. कोणी काहीही बडबड केली तरी फरक पडणार नाही, आमचं सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेलच, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

जमिनी खरेदी करणं हा तुमचा व्यवसाय आहे का? हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं- किरीट सोमय्या

…म्हणूनच फडणवीसांना सरकार पडणार हे सारखं सांगावं लागतंय- जयंत पाटील

… ‘या’साठी जागतिक आरोग्य संघटनेच्या अध्यक्षांनी मानले पंतप्रधानांचे आभार

महाराष्ट्रात दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजणार- नारायण राणे

राज्यात जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या