बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुख्यमंत्र्यांनी झोपडपट्टीत फिरावं अन्…’; चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

पुणे | कोरोनाच्या वाढत्या प्रमाणात ल़ॉकडाऊन हे उत्तर नाही. आता जर लॉकडाऊन केलं तर तुम्ही एक रुपयाचं पॅकेज देणार नाही. वर्षभर लोक कसं जगले, ते तुम्हाला मातोश्रीत बसून कळणार नाही. त्यासाठी ठिकठिकाणी फिरावं लागेल, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

कोरोना संसर्गजन्य आहे. पण त्याचे नियम पाळूनही तुम्ही घरी बसायला सांगत असाल तर ते शक्य नाही. आम्ही लॉकडाऊनला कडाडून विरोध करू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.

सर्वसामान्यांना नाईट लाईफ नको. त्यांना सातच्या आत घरात जायचं. दिवसभराचे दिनक्रम चालूच राहिले पाहिजेत. चाचण्या वाढवणं गरजेचे आहेत. ज्याला काहीही लक्षण नाहीत त्यांचेही टेस्टिंग करा. रुग्ण लवकर कळतील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात काल मध्यरात्रीपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर निर्बंधांचे काटेकोर पालन होत नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

‘त्यानं माझ्या स्कर्टमध्ये हात घातला अन्…’; ‘या’ अभिनेत्रीनं सांगितलं होळी न खेळण्यामागचं धक्कादायक कारण

भाजप नेत्याकडून भाजपच्याच कार्यकर्त्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

शरद पवारांना नेमकं काय झालंय?; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

…म्हणून हार्दिक पांड्यानं भर मैदानात घातला साष्टांग दंडवत, पाहा गमतीदार व्हिडीओ

‘अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून सांगितलं पाहिजे…; महाराष्ट्राची वाट लावू नका’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More