बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय की नाही ते सांगा”

मुंबई | आरक्षणाच्या प्रकरणावरुन सर्वत्र वातावरण ढवळून निघालं आहे. कालच 127 वी घटनादुरूस्ती करण्यात आली. राज्यांना नवे प्रवर्ग तयार करण्याचा आणि त्यांना आरक्षण बहाल करण्याचा अधिकार या घटनादुरूस्तीने देण्यात आला आहे. यावर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळात हे विधेयक बहुमताने मंजुर झालं.

आरक्षणाला असलेली 50 टक्क्यांची मर्यादा जोपर्यंत शिथील होत नाही तोपर्यंत कोणतंही राज्य काहीच नाही करू शकत. अशा शब्दात विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली. महाराष्ट्र सरकार आणि भाजप या दोन्ही मध्ये या प्रकरणावरुन जोरदार राजकीय जुगलबंदी रंगली आहे. सरकार आणि विरोधी पक्ष एकमेकांवर जोरदार टीका करताना व मराठा आरक्षण अवैध ठरल्याबद्दल एकमेकांना दोष देत आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांंत पाटील यांनी थेट मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांना दोषी ठरवलं आहे. अशोकरावांनी आता स्पष्ट सांगावं की ते मराठा समाजाला आरक्षण देणार आहेत का नाही. काही झालं की केंद्राकडे बोट दाखवायचं ही भूमिका आता सोडून द्या व मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी जहरी टीका त्यांनी केली.

आमच्या सरकारने फडणविसांच्या नेतृत्वात न्यायालयात टीकणारं आरक्षण मराठा समाजाला दिलं पण या सरकारने हे आरक्षण घालवलं हे यांचं पाप आहे. समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार आता राज्यांना भेटला आहे त्यांनी मागास आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय द्यावा, असंही ते म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आजची आकडेवारी

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

भाजपच्या पोटात मराठा आरक्षणाविषयी आकस- सुप्रिया सुळेेेंचा भाजपवर निशाणा

दिलासादायक! येत्या चार ते पाच दिवसात होणार पावसाचं दमदार आगमन, हवामान खात्याचा अंदाज

एक, दोन नाही तर तब्बल तीन शतके ठोकूनही ‘या’ स्फोटक खेळाडूला संघात स्थान नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More