कोल्हापूर महाराष्ट्र

…तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर | राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळे लढले असते, तर त्यांच्या राज्यात राष्ट्रवादीला 20 आणि काँग्रेसला 10 जागाच आल्या असत्या, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय.

चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सामनातील मुलाखतीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असं म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदार कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रशासनाला हे सरकार 5 वर्षे टिकणार आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न झाला, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत सरकार पाडून दाखवा असं म्हणत आहेत, पण सरकार पाडण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. तुम्ही वेगळे लढला असता तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या. तुम्ही एकत्र लढूनही तुमच्या एकूण 98 जागा निवडून आल्या आणि आमच्या एकट्याच्या 105 निवडून आल्या आहेत, असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी, बघू ते मुलाखत देतात का?- संजय राऊत

धक्कादायक! भाजप मंत्र्याच्या मुलाला रोखल्यामुळे पोलिस महिलेला द्यावा लागला राजीनामा

महत्वाच्या बातम्या-

पुणेकरांनो आतातरी घरी बसा, आयसीयू, ऑक्सिजन अन् बेडही नाहीत!

‘नया है वह’ म्हणत फडणवीसांची आदित्य ठाकरेंवर टीका, संजय राऊतांचं फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर

खळबळजनक! भाजप आमदाराचा फास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या