बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

TET घोटाळा: “सुपेंवर महाविकास आघाडी सरकारचा वरदहस्त,नाहीतर हे शक्यच नाही”

मुंबई | राज्य परिक्षा आयोगाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी टीईटी (TET) परीक्षेत मोठा गैरव्यवहार केला. याप्रकरणी तुकाराम सुपेंकडे (Tukaram Supe) मोठं घबाड सापडलं. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुपेंसह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

‘एकीकडे परिक्षांमध्ये घोळ करायचा आणि दुसरीकडे कोट्यवधींची संपत्ती गोळा करायची. तुकाराम सुपेंवर महाविकास आघाडी सरकारचा वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही’, असा घणाघात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे.

अधिकाऱ्यांना हाताशी धरून महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) अनेक विभागात पैसे खात सुटलं आहे, असा आरोप देखील चंद्रकांत पाटलांनी केला आहे. तर यांना काय भस्म्या झाला आहे का? असा खोचक सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, ‘परिक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत आणि हे लोक लुटारू सत्ताधाऱ्यांसोबत मिळून आपले खिसे भरत सुटले आहेत. लाखो मुलांच्या आयुष्याबरोबर खेळताना तुम्हाला लाज वाटत नाही का?’, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

थोडक्यात बातम्या-

“हे कसलं सरकार आहे ज्यांना सभागृह देखील सांभाळता येत नाही”

अखेर चिंता मिटली! Omicron बाबत दिलासादायक माहिती आली समोर

एसटी संप मागे! संपाची नोटीस देणारे अजय गुजर यांची मोठी घोषणा

म्हाडाची परिक्षा ऑनलाईन पद्धतीनेच; पेपर फुटीनंतर नवी तारीख जाहीर

‘…कदाचित खूप उशीर झाला आहे’; Omicron बाबत धक्कादायक माहिती आली समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More