पुणे महाराष्ट्र

“अरे बंगल्यांवर उधळपट्टी कशाला करताय, बंगले पूर्ण होण्याआधीच तुम्ही जाणार आहात”

पुणे |  मंत्र्यांच्या बंगल्यावर ठाकरे सरकारकडून कोटींची उधळपट्टी करण्यात येत आहे. मंत्र्यांच्या 31 बंगल्यांच्या डागडुजी, नुतनीकरणासाठी तब्बल 15 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. मात्र, यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

अरे तुम्ही किती दिवस राहणार आहात, तुमचे बंगले पूर्ण होण्याआधीच तुम्ही जाणार आहात. पण त्यासाठी तुम्ही किती खर्च कराल. टेंडरपण अजून काढलं नाही. उधळपट्टी चालू आहे. तसेच कमीतकमी वेळात जास्तीत जास्त ताटात ओढण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं म्हणत पाटलांनी टीका केली आहे.

आपण लोकांचे सेवक आहोत त्यामुळे आपण कमीत कमी सुविधा घ्यायला हवी. मी पाच वर्षात माझ्या बंगल्याचा रंगही बदलला नाही. मात्र, आज तुम्ही आज बंगल्याचं सर्व चित्र बदलत आहात. या सरकारची नुसती उधळपट्टी सुरु आहे, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, दर पाच वर्षांनी ही डागडुजी करण्यात येते असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, केवळ पाच वर्षातच इतकी मोठी रक्कम बंगल्यावर खर्च करणे योग्य आहे का? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘आप’मतलब्यांचा पराभव झाला; ‘सामना’तून भाजपवर टीकास्त्र

दिल्लीत काँग्रेसवर नामुष्की! 70 पैकी 67 जागांवर डिपॉझिट जप्त

महत्वाच्या बातम्या- 

…म्हणून रितेश-जेनेलिया घेणार महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची पत्नीसह भेट!

शाहरूख खानसोबत तुलना म्हणजे सन्मानाची गोष्ट- कार्तिक आर्यन

धनंजय मुंडेंची दिलदारी…फ्लाईट चुकलेल्या जवानाला काढून दिलं तिकीट!

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या