बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तुमचे बाप कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे”

मुंबई | सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली. याला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर देत चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय.

काय तर म्हणे, आम्ही तुमचे बाप आहोत. निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर 105 आमदारांना बेकार करून मविआ सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, अशी बोचरी टीका अमोल मिटकरी यांनी चंद्रकांत पाटलांवर केलीये.

2022 ला पुणे मनपात पुण्याची जनता अजितदादा पवार हेच तुमचे बाप आहोत हे सिद्ध करून दाखवेल, असा टोलाही मिटकरींनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धीच मिळत नाही”

गुड न्यूज! मुंबईत 84 टक्के रूग्ण कोरोनामुक्त

“बेकायदेशीर काम कायद्याने थांबवा, सुरुवात भाजपपासून करा”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लाँच करणार ‘स्वामित्व योजना’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More