महाराष्ट्र मुंबई

“उद्धवजी…तुमची प्रतिमा कशीही असो, किमान महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होणार नाही ही काळजी घ्या”

मुंबई | राज्य सरकारकडून एका खासगी संस्थेला जनसंपर्कासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र सरकारने एका खाजगी संस्थेला स्वतःच्या जनसंपर्कासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी काही दिवसांपूर्वी सुमारे 6 कोटी रुपयांचं टेंडर काढलं आहे. राज्य सरकारला असं वाटत आहे की जनतेचा त्यांच्याविषयी असलेला दृष्टिकोन बदलण्यात त्या संस्थेने मदत करावी. म्हणजे सरळ सरळ जनतेची दिशाभूल करून त्यांना चुकीच्या दिशेने नेण्यास प्रवृत्त करावं, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

त्या सहा कोटींमध्ये 25 ते 30 हजार लोकांच्या कोरोना चाचण्या झाल्या असत्या हा तरी विचार राज्य सरकारने करायला हवा होता, उद्धवजी, तुमची प्रतिमा चांगली वाईट कशीही असो, या कठीण काळात कमीत कमी महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होणार नाही याची तरी काळजी घ्या, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

तुमची ओळख तेव्हाच सुधारेल जेव्हा तुम्ही केवळ जनसंपर्क नाही तर खऱ्या अर्थाने जनहितार्थाचे कर्तव्य पार पाडाल, असा टोलाही पाटलांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोनावर मात!

‘ती’ अभिनेत्री काय नाव घ्यायच्या लायकीची नाही- अनिल देशमुख

अभिनेत्री मलायका अरोराची कोरोनावर मात

आनंदाची बातमी! राज्यात आज 26 हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी

“सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना अटक करा, नावं जाहीर करा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या