कोल्हापूर महाराष्ट्र

आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर | ठाकरे सरकार गोंधळलेलं आणि दिशा नसलेलं सरकार आहे. वर्षभर तुम्ही कसं काम करता, ते जनतेने पाहिलं. आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीये. ते टीव्ही9 मराठीशी बोलत होते.

सरकारमध्ये एकजिनसीपणा नाही. प्रत्येक जण आपापलं डिपार्टमेंट संभाळतो. मुख्यमंत्र्यांकडे व्हिजन असावं लागतं. त्यांनी सर्वांना खेचून न्यायचं असतं. मात्र ही उद्धव ठाकरेंची तयारी नाही. सरकार चालवणं हे त्यांचं काम नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

वर्षभर तुम्ही कसं काम करता ते जनतेने पाहिलं आहे, आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांची गरिमा राखणारी ही भाषा नाही, सामनाच्या मुलाखतीतून फक्त धमक्या दिल्या. मुख्यमंत्र्यांची भाषा ही संयमी असावी. मुख्यमंत्री आश्वासक वाटावा, भीतीदायक नाही. त्यांनी सहनशीलता वाढवली पाहिजे, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय.

महत्वाच्या बातम्या-

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णव गोस्वामींना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झापलं!

‘कंगणाविरोधातील कारवाई सूडबुद्धीने’; उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारलं

स्मिथ आणि फिंचची दमदार शतकं; ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 375 धावांचं खडतर आव्हान

प्रताप सरनाईक प्रकरणासंदर्भात ईडीने केला मोठा खुलासा

राज्यातील सध्याचे सरकार लवकरच कोसळेल कारण…-राम शिंदे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या