Top News महाराष्ट्र

शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर चंद्रकांत पाटलांचा पडळकरांना सल्ला, म्हणाले…

Photo Credit- Chandrakant Patil & Gopichand Padalkar Facebook

सांगली | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी इथल्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. मात्र या पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते नियोजित होतं. मात्र त्यापूर्वीच पडळकरांनी मेंढपाळांच्या हस्ते हे अनावरण केलं. त्याचवेळी बोलताना पडळकरांनी शरद पवार आणि पवार कुटुंबियांवर टीका केली होती.

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर कठोर शब्दांत टीका केल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोपीचंद पडळकरांचे कान टोचले आहेत. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

मागेही गोपीचंद यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह विधान केले हिते. त्यावेळी त्यांना फडणवीस यांनी समजावून सांगितले होते. आताही त्यांना आम्ही जाहीर सांगतोय की जे ते बोलायचं असतं. पण नीट बोलायचं असतं, असं म्हणत चंद्रकांत पाटील म्हणालेत.

अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण हे एका चारित्र्यसंपन्न, निष्कलंक माणसाच्या हातून व्हायला हवं ही आमची इच्छा होती. पण ज्यांच्या हस्ते उद्घाटन ठेवलं होतं, ते शरद पवार यांचं वागणं, विचार हे अहिल्यादेवींच्या उलट आहेत, अशी टीका पडळकरांनी केली होती.

दरम्यान, पवारांवर कठोर शब्दांमध्ये टीका केल्या नंतरया गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात वाद झाला होता. तसेच त्यांनतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका होत होती.

थोडक्यात बातम्या-

जेनेलिया देशमुखने शेअर केला बेडवर डान्स करतानाचा व्हीडिओ, पाहा व्हीडिओ

“ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी विकास करण्याऐवजी भानगडी केल्या”

‘तिच्या वेदना पाहून मी…’; नवऱ्याने ‘व्हॅलेंटाईन डे’ला पत्नीला गिफ्ट केली किडणी

‘…तिथे तिथे मी नडणार आणि भिडणारच’; चित्रा वाघ आक्रमक

“फुकटचं दिलं तर लोकांना वाटतं गडकरींजवळ खूप हरामचा माल आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या