बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पण हे कृषी कायदे मागे घेतल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार”

मुंबई | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लागू केलेले कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय काल घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन सुरू होतं. तसेच या आंदोलनाला मधल्या काही काळात हिंसक वळण प्राप्त झाल्याचंही पाहायला मिळालं होतं. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर आता अनेक राजकीय प्रतिक्रीया उमटताना दिसून येत आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधानांच्या कृषी कायदे करण्याच्या घोषणेनंतर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना खंत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत दु:खाने आणि नाईलाजाने हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे. कृषी कायदे मागे घेतल्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल, अशी खंतही यावेळी बोलत असताना चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखवली.

इचलकरंजी येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना शेतकरीपुत्र म्हणून आपल्याला असं वाटतं की, कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात आनंद येणार होता. तसेच शेतीमालालाही चांगला भाव मिळणार होता. परंतु, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही भागातील शेतकऱ्यांनी या कायद्याला विरोध केला. पण देशातील इतर शेतकरी व शेतकरी संघटनांना ते मान्य होते, अशी प्रतिक्रीया चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली आहे.

देशातील एका छोट्या समुहाला या कृषी कायद्याचं महत्त्व पटवून देण्यात अपयश आलं आहे. असं म्हणत देशातील एका विशिष्ट गटाने या मुद्यावरून अस्वस्थता निर्माण केली, असंही पाटील म्हणाले. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असणारे आणि शेतकरीहिताचे हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे कसे आहेत, हे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना समजावून सांगून ते अंमलात आणावेत, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली आहे.

थोडक्यात बातम्या

Mr 360 चं वर्तुळ पुर्ण; महान खेळाडू एबी डिव्हिलीयर्सची क्रिकेटमधून निवृत्ती

“अन्नदात्यांना खलिस्तानी, देशद्रोही म्हणल्याबद्दल नरेंद्र मोदींनी माफी मागावी”

‘मुंबईतील ते बार समीर वानखेडेंच्या मालकीचं?’; नवाब मलिकांच्या नव्या दाव्याने खळबळ

“लज्जास्पद, दु:खद आणि पुर्णपणे अन्यायकारक निर्णय”

“वर्षभर आधीच हा निर्णय घेतला असता तर 450 शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More