बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आधी आपल्या बुडाखाली काय शिजतंय ते चंद्रकांत पाटलांनी पहावं- सतेज पाटील

कोल्हापूर | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती. यालाच गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रत्यु्त्तर दिलंय. आधी आपल्या बुडाखाली काय शिजतंय ते चंद्रकांत पाटलांनी पहावं, अशा शब्दांत सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार केला आहे.

गेली पाच वर्षे मंत्रिपदी राहिलेले चंद्रकांत पाटील यांना प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायची सवय लागली आहे. कदाचित ते कोरोना काळातही एखादा इव्हेंट करून दाखवतील. त्यांना मंत्रिपदाच्या काळात कोल्हापूरच्या विकासासाठी काही करता आलं नाही, अशी टीका सतेज पाटील यांनी केली आहे.

मी पालकमंत्री असलो तरी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राजेंद्र पाटील-यड्रावकर असे आम्ही तिघंही एकत्रित काम करत असल्याने कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिलाय. कोल्हापूरविषयी प्रेम वाटत होतं तर 22 मार्चपासून चंद्रकांत पाटील कुठं होते?, असा सावलही सतेज पाटलांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नसल्यामुळे योग्य माहिती चंद्रकांत पाटील यांना कळाली नसेल. कदाचित ते उद्या पुन्हा कोल्हापूर सोडून जातील आणि पावसाळा सुरु झाल्यावर परत येतील, असा चिमटाही सतेज पाटील यांनी काढला.

ट्रेंडिंग बातम्या-

“सुरतमध्ये मजुरांच्या असंतोषाचा भडका, भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा”

काँग्रेसची ‘न्याय योजना’, राज्यातील 29 हजार कुटुंबांना प्रत्येकी ‘इतक्या’ रुपयांचं वाटप

महत्वाच्या बातम्या-

‘गुंडगिरी प्रवृत्तीची लोक राजकारणात येतात तेव्हा…’; प्रकाश आंबेडकरांची निलेश राणेंवर टीका

राज्यात आज कोरोनाचे 2 हजार 345 नवे रूग्ण; पाहा तुमच्या भागात किती?

विधानपरिषदेत अमोल मिटकरी त्यांच्या कामाचा ठसा उमटवतील- प्रवीण गायकवाड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More