बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धवजी, शरद पवार हे शिवसेना संपवायला निघाले आहेत”

सांगली | शरद पवार हे शिवसेना संपवायचं काम करत आहेत. वाझेंना निलंबित केलं जातं तर शरद पवार आता अनिल देशमुख यांना का वाचवत आहेत? उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. त्यांनी योग्य निर्णय घ्यावा, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सांगलीत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले. संजय राठोड यांच्यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होते, मग धनंजय मुंडे यांच्यामुळे होत नाही का, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यावर दबाव आणत आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.

शरद पवार यांच्या आतापर्यंतच्या 52 ते 56 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यायला लावले आहेत. मग ते अनिल देशमुख यांना पाठिशी का घालत आहेत? मात्र अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, तसेच त्यांची चौकशीही झाली पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचं गुढ उकललं; पोलिस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडेंच्या फेसबुक पोस्टने खळबळ

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण!

“बरंच काही बोलून काहीही न सांगणं हे शरद पवारांचं वैशिष्ट्य”

1 लाख रुपयात बुक करा BMW ची शानदार कार; जाणून घ्या किंमत

महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पुढील काही तासांमध्ये कोसळणार पाऊस!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More