Top News

…मग तुम्ही सत्तेत का बसला आहात?- चंद्रकांत पाटील

मुंबई | शेतकऱ्यांचे दुःख दूर करू शकत नाही, महिलांना संरक्षण देऊ शकत नाही, धर्माचे रक्षण करू शकत नाही, विकास करू शकत नाही मग तुम्ही सत्तेत का बसला आहात?, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे.

कोरोना काळात आलेल्या वाढीव वीज बिलांबाबत राज्य सरकारने गोंधळाची परिस्थिती केली आहे. शाळा सुरू करण्यावरून सरकारमध्ये ताळमेळ नाही. 1 जानेवारीपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावं अशी मागणी आम्ही अगोदर केलेली आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

कोरोना काळात केंद्राने जवळजवळ सर्व सुविधा दिल्या तरीही राज्य सरकार प्रत्येक गोष्टीचं खापर केंद्रावर फोडत आहे, राज्य सरकारने कोरोना काळात कसला खर्च केला?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केलाय.

ठाकरे सरकारने महाराष्ट्राचं एक वर्ष वाया घालवलं आहे, त्यांच्या ढिसाळ कारभाराची भरपाई करण्यासाठी राज्याला अनेक वर्षे लागतील, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीये.

महत्वाच्या बातम्या- 

वीजबिल माफीसाठी सलून व्यावसायिक आक्रमक, सरकारविरोधात राज्यभर आंदोलन करणार

‘भाजप हवेत चालणारा पक्ष असेल तर राष्ट्रवादी…’; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला टोला

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा एकदा एअर स्ट्राईक; दहशतवाद्यांचे अनेक बंकर्स उद्ध्वस्त

सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागं करण्यासाठी राज्यात वीजबिलांच्या होळीचं आंदोलन करणार- चंद्रकांत पाटील

“शेतकऱ्यांनी थकबाकी भरल्यास 50 टक्के वीजबिल माफी मिळणार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या