दुपारी झोपण्यावरून चंद्रकांत पाटलांचा पुणेकरांना टोला, म्हणाले…
पुणे | पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांना दुपारी 1 ते 4 झोपण्याच्या सवयीवरुन टोला लगावला आहे.
पुण्यात काही जणांना दुपारी 1 ते 4 झोपण्याची सवय असते. या काळात काही काम सांगू नका असं सांगितलं जातं. मोदींकडे बघा ते 22 तास काम करतात असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. ते पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
नरेंद्र मोदी 22 तास काम करतात. त्यांचं टार्गेट ठरलेलं आहे. एक स्थिती असते की जिकडे तुम्ही न झोपता सुद्धा राहू शकता. त्या दिशेने त्यांचा प्रयत्न चाललेला आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
काही जणांना दुपारी झोपण्याची सवय असते. पुणे परिसरात जास्त आहे. दुपारी एक ते चार काही सांगू नका, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
मी आता टेन्शन फ्री, इतरांना टेन्शन देण्याचं काम करणार- एकनाथ खडसे
महिलेने वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून लगावली कानशिलात; व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
हे वर्ष आमचं नव्हतंच, संघाला नशिबाची साथ देखील मिळाली नाही- धोनी
जम्मू काश्मीरचा झेंडा मिळत नाही तोपर्यंत अन्य ध्वज फडकवणार नाही- मेहबुबा मुफ्ती
Comments are closed.