बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरेंचं मोदींशी जमतं पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही”

पुणे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं जमतंय पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही, पण आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावर प्रतिक्रिया देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे सूचक वक्तव्य केलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी यांच्यासोबत संवाद साधला याचं आम्ही स्वागत करतो. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन ते तिथे गेले होते, त्यामुळे ही चांगली बाब आहे. पण केंद्राकडे आणि मोदींकडे आरक्षणाचा काहीच मुद्दा नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. पण, केंद्राने यावर मार्ग काढण्यास प्रयत्न करण्याचे सांगितलं आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील मराठा समाजाची दिशाभूल केली जातेय, पंतप्रधानाकडे यासंदर्भात काहीच नाही. मराठा समाज हा मागास आहे हे आधी ठरवावं लागेल. राज्य सरकारकडून धूळफेक सुरू आहे, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केलाय.

थोडक्यात बातम्या- 

लहान मुलांसाठी अनोखं टेस्टींग किट; 15 मिनिटांत होणार कोरोनाचं निदान

“अमित शहांसारख्या नेत्यांमुळेच कोरोनाचा प्रसार वाढला”

तरुणाकडून माणुसकीचं दर्शन! अशा प्रकारे वाचवले पक्षाचे प्राण, पाहा व्हिडीओ

“…तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत”

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More