बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमचा उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीला विरोध नाही- चंद्रकांत पाटील

पुणे | उद्धव ठाकरेंना 28 मेपर्यंत कोणताच धोका नाही. त्याला आणखी वेळ असताना एवढी घाई का?  राज्यपाल कोट्याचा एका दिवसात निर्णय घेता येईल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विधान परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील समितीने उद्धव ठाकरे यांची शिफारस करणं चुकीचं आहे. वरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेच्या जागेवर भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केला जात आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

28 मे पर्यंत उद्धव ठाकरे यांना धोका नाही. आमचा त्यांना विरोध नाही किंवा त्याला हरकत देखील नाही. मात्र महाविकासआघाडीकडून राजकारण सुरू असल्याच चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या पी एम रिलिफ फंडला पैसे द्यायला हरकत नाही. केंद्र सरकारने सर्वाधिक साहित्य महाराष्ट्राला दिलंय, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

“पालघर प्रकरणी 8 तासांत 101 आरोपी ताब्यात, त्यात एकही मुस्लिम नाही, जातीचं राजकारण करू नका”

मंत्री जितेंद्र आव्हाड रूग्णालयात दाखल

महत्वाच्या बातम्या-

केंद्राचा मोठा निर्णय! डॉक्टरांवर हल्ला केल्यास दाखल होणार अजामीनपात्र गुन्हा

‘…तर मी आत्महत्या करेन’; नसीरूद्दीन शाह यांचं धक्कादायक वक्तव्य

चार महिन्यात सोलापूरला राष्ट्रवादीचा तिसरा पालकमंत्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More