Top News महाराष्ट्र मुंबई

“2024मध्ये काँग्रेसला एका बसमध्ये बसवून नेता येईल येवढेच खासदार मिळणार”

मुंबई | 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप 400 चा आकडा क्रॉस करणार असल्याचा दावा महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. केंद्राच्या नव्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ कणकवलीमध्ये व्य रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय पाहता भाजप 400 चा आकडा क्रॉस करेलच मात्र 2024 ला काँग्रेसला एका बसमध्ये बसवून नेता येईल येवढेच खासदार मिळणार असल्याचं म्हणत पाटलांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

कणकवलीमध्ये चंद्रकांत पाटील, भाजप नेते नारायण राणे, नितेश राणे यांच्या उपस्थितीत कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. यावेळी नारायण राणेंनी कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याचं सांगितलं. त्यासोबतच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीवर टीका केली.

दरम्यान, राहुल गांधींना शेतीमधलं काय कळतं?, ते शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याच्या गोष्टी करतात, असं नारायण राणे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी”

“छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नाही पण औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावं

मोठी बातमी! पोलीस भरतीबाबतचा ‘तो’ वादग्रस्त जीआर अखेर रद्द

ऐतिहासिक! पुरूष कसोटी सामन्यात पहिल्यांदाच दिसणार महिला अंपायर

“पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या