पुणे | औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यास काँग्रेसचा विरोध आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला सवाल केला आहे.
काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला? ते पहिले हटवा. अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का?, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. पुण्यात ते माध्यमांशा बोलत होते.
औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही. तो आमचा श्रद्धेचा विषय आहे. तसंच निवडणुकीचा मुद्दा देखील नसल्याचं पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, संभाजी महाराजांचं नाव हे संभाजीनगर शहराला असणं याबाबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून भूमिका होती. मात्र मी ही मागणी केल्यावर माझ्यावर सामनाने अग्रलेख लिहिला असल्याचं पाटील म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
‘सरपंच पदाचा लिलाव म्हणजे…’; अण्णा हजारेंचं मोठं वक्तव्य
आयटीआयची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू!
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आरोग्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना
कोरोना रुग्णांना वाचवण्यात भारत इतर देशांपेक्षा कितीतरी पटीने आघाडीवर- नरेंद्र मोदी
कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊ देणार नाही- अजित पवार