बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“छगन भुजबळ, वडेट्टीवार, मुंडेंसारखे मंत्री तोंडाला डिंक लावल्यासारखे गप्प”

मुंबई | राज्यात आरक्षणारून विरोधी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ओबीसी आरक्षणावरून राज्याच्या मंंत्रिमंडळातील ओबीसी नेत्यांवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये असूनही ओबीसी समाजाच्या हिताचे ढोंग रचणारे छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे यांच्यासारखे मंत्री या विषयाबाबत तोंडाला डिंक लावल्याप्रमाणे गप्प बसतात ही आश्चर्याची बाब आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण मिळेपर्यंत आम्ही निवडणूका होऊ देणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजासोबत अन्याय करू पाहत असेल. तर भाजप तो अन्याय होऊ देणार नाही. जर सत्ताबळाच्या आधारे आरक्षण मिळण्यापूर्वी निवडणुका लावल्या तरीही ओबीसी समाजासाठी राखीव असलेल्या मतदारसंघात ओबीसी समाजाच्या उमेदवारांनाच उभे करण्यात येईल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, भाजपचे या विषयाबाबतचे धोरण अतिशय सुस्पष्ट आणि ठाम आहे. राजकीय आरक्षण हा ओबीसी समाजाचा अधिकार आहे. मा. न्यायालयाचा बागुलबुवा दाखवून जर कोणी असं म्हणत असेल की आम्ही ओबीसी उमेदवारांना आरक्षण देणार नाही, तर ते आम्ही होऊ देणार नाही, असंही पाटील म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

लोक सूज्ञ, कोणतंही सरकार कायम नसतं- अमित ठाकरे

उद्यापासून 4 दिवस बँका बंद; जाणून घ्या कारण!

“जनता कुंभकर्णासारखी झोपली आहे, मी एकटा काय करू?”

अबब! थेट कारवरच उतरलं विमान… बघा नेमका काय घडला प्रकार

“आम्ही अस्वल… आमच्यावर खूप केस आहेत, दहीहंडी करणारच”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More