बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, सर्वधर्म समभावाची नाही”

पुणे | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोटबँक तयार केली असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर स्पष्टीकरण देतानाही नव्या वादाला तोंड फुटणारं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं आहे.

‘मी म्हणालो की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची वोटबँक तयार केली. त्याचा अर्थ असा नाही की ईव्हीएम मशिन घेऊन तयार केली. तर त्यांनी जनमत तयार केलं त्यात चुकलं काय?’, असा सवाल देखील चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला. ‘याच वक्तव्याला घेऊन कुणीतरू निदर्शने करणार होतं. मला धमकी आली, मात्र हम किसीको टोकेंगे नही, किसीने टोका तो छोडेंगे नही, असा इशाराही चंद्रकांत पाटलांनी दिला आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सर्वधर्म समभावाची नाही. त्यांनी शंकराची आणि हिंदू धर्माची पूजा केली. कारण हिंदू धर्म हा सर्वधर्म शिकवतो’, असं वक्तव्य देखील चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यांमुळे पुन्हा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chatrapati Shivaji Maharaj) हिंदूंची वोटबँक आणली. त्यावर अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कळस चढवला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. या वक्तव्यानंतर विरोधकांंकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या-

बाळा नांदगावकर मनसे सोडणार???, नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं…

जेवणाच्या पंगतीत राज ठाकरे खुर्चीवर अन् कार्यकर्ते जमिनीवर; मनसेनं सांगितलं कारण

‘पाॅर्न पाहण्याच्या व्यसनामुळे मी उद्धवस्त झाले’; प्रसिद्ध राॅकस्टारचा धक्कादायक खुलासा

“सत्तेत बसलेल्या श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांची वाट लावली”

“आम्ही आहोत म्हणूनच राज्यात सत्ता”, अशोक चव्हाण यांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More