Top News पुणे महाराष्ट्र

संभाजी महाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल तर तर दुसरं नाव सांगा- चंद्रकांत पाटील

पुणे | आमच्या हातात गुजरात द्या आम्ही “अहमदाबाद”चे नाव बदलुन दाखवतो, वाटल्यास तुमचं नाव देतो, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती. मात्र या टीकेला पाटलांनी प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीला सवाल केला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अहमदाबादचं नाव कर्णावती करायला माझी काहीच हरकत नाही. मात्र जिथे तुमची सत्ता आहे तिथली नाव आधी बदला ना, असं पाटलांनी म्हटलं आहे. त्यासोबतच संभाजीमहाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल, तर दुसरं नाव सांगा, असा सवालही पाटलांनी राष्ट्रवादीला केला आहे.

देशामध्ये परकीय आक्रमणाची जी खाणाखुणा असलेली नावं आहेत ती बदला. अहमदाबादचं नाव बदला, उस्मानाबादचं पण बदला, माझी काहीच अडचण नाही पण औरंगाबादचं नाव बदलायचं नाही, असं तुम्ही ठरवत असाल तर तुमचं औरंगजेबावर प्रेम आहे का?, असं पाटलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीला केवळ महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करायचं आहे. यांच्याकडे औरंगाबादचं संभाजीनगर करायची इच्छाशक्ती नसल्याचं म्हणत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या-

…तर मग यावर्षीचा प्रजासत्ताक दिन सोहळा रद्द का करू नये?- शशी थरूर

‘…तर नेपाळ भारतात असता’; प्रणब मुखर्जींनी आपल्या अखेरच्या पुस्तकात सांगितली राज की बात

“काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष राहुल गांधी किंवा सोनिया गांधी नाही तर शिवसेना ठरवणार, काँग्रेसचा स्वाभिमान संपला”

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माचं पुनरागमन

‘आम्ही नाटक कंपनी असलो तरी…’; निलम गोऱ्हेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या