बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

MLC Election Result | “नाना पटोले यांच्या हुकूमशाहीला जनतेनं जागा दाखवली”

नागपूर | नागपूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला (Congress) धूळ चारत भाजपने (BJP) बाजी मारली आहे (Nagpur Legislative Council Election Result). भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा या निवडणुकीत एकतर्फी विजय झाला आहे. या विजयानंतर बावनकुळे यांनी थेट काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसच्या पक्षांतर्गत वादाचा फायदा बावनकुळेंना झाला. मतदारांनी निवडून दिल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. तर थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर घणाघात केला आहे.

‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हुकूमशाहीला जनतेनं जागा दाखवली’, असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील मतदारांनी माझ्यावर प्रेम केलं त्यामुळे हा विजय मिळाला आहे, असंही बावनकुळे म्हणाले आहेत.

दरम्यान, हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवणे हेच काँग्रेसमधील प्रचंड अफरातफरी मागील कारण असल्याची टीका बावनकुळे यांनी केली आहे. ‘नाना पटोलेंनी हुकूमशाही पद्धतीने एका मतदाराला मतदान करायला लावले आणि दुसऱ्या उमेदवाराला उभे केले हे मतदारांना मान्य नव्हते’,अशी टीकाही बावनकुळेंनी केली.

थोडक्यात बातम्या-

अकोला विधान परिषद निवडणूक: अकोल्यातही भाजपचा झेंडा, महाविकास आघाडीला मोठा धक्का

‘मी दिल्लीतच आहे, माझ्यावर कारवाई करा’; संजय राऊत यांचं खुलं आव्हान

नागपूर विधान परिषद निवडणूक: भाजपचा काॅंग्रेसवर दणदणीत विजय, बावनकुळे पुन्हा आमदार

धक्कादायक! म्हाडा पेपर फोडण्यासाठी ‘या’ खास कोडवर्डचा केला वापर

अजब लग्नाची गजब वरात! नवरदेवाला घेऊन घोडा फरार, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More