बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्र फडणवीसांऐवजी चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री करा”

नागपूर | देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. नागपूरमध्ये फडणवीस आणि देशमुख यांच्यात विधानसभेची लढत झाली होती. यात देशमुखांचा पराभव झाला होता.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. तसेच माझ्याविरुद्ध लढताना त्यांचं मताधिक्यही कमी झालं आहे. त्यामुळे फडणवीसांना मुख्यमंत्रिपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

प्रचारादरम्यान फडणवीसांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना मोठी जबाबदारी देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे उमेदवारी नाकारण्यात आलेल्या बावनकुळेंना फडणवीसांनी स्वत:ऐवजी मुख्यमंत्री करावं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. शिवसेनेनं मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याची मागणी भाजपकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More