बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्ही त्यावेळी जेलमध्ये होता, भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये”

नागपूर | भाजपचं आजचं आंदोलन राजकारणापोटी आहे. त्यांना दाखवायचं आहे की आम्ही ओबीसींसोबत आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्त्व करावं आणि केंद्र सरकारकडे जाऊन इम्पेरिकल डाटा मागावा, अशी टीका राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर केली. त्यांच्या या टीकेला भाजपचे महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहे, मात्र मला दुःखानं सांगावं लागत की या वयात त्यांना खोटं बोलावं लागतं. 2018 ला जेव्हा ही केस सुरू झाली तेव्हा ते जेलमध्ये होते. या संपूर्ण केसची जबाबदारी फडणवीस यांनी मला दिली होती. मी रात्र रात्र बसून या अध्यादेशावर काम केलं आणि अध्यादेश तयार केला. त्यामुळे त्यांच्या या बोलण्यावर किंव येते की असं त्यांना का बोलावं लागलं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

ठाकरे सरकार आलं तेव्हा आम्ही भुजबळ, वडेट्टीवार, नाना पटोले यांना भेटलो. त्यांना अध्यादेश लॅप्स होत आहे असं सांगितलं. त्यांनी तो कन्टिन्यू केला नाही. हे त्यांच्या अंगावर येत आहे. म्हणून ते आता असं बोलत फिरत आहेत, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळेंनी केली.

छगन भुजबळ यांनी या वयात तरी खोटं बोलू नये. ते खोटं बोलत आहे आणि रेटून खोटं बोलत आहेत. पण ओबीसी आंदोलनात राजकारण आम्हाला करायचं नाही, असं बावनकुळे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

डेल्टा प्लस व्हेरिएंटपासून सुरक्षिततेसाठी AIIMSच्या संचालकांनी सांगितला हा मोठा पर्याय!

‘ज्याने त्याने ज्याचा त्याचा पक्ष वाढवावा, पण…’; गुलाबराव पाटील यांचं आवाहन

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; कोरोनामुक्तीचा दर पोहोचला 96 टक्क्यांवर

राज्यात आज विक्रमी लसीकरणाची नोंद! तब्बल ‘एवढ्या’ नागरिकांनी घेतली लस

शेतकऱ्यांची पुढील लढाई केव्हा आणि कुठे होईल? राकेश टिकैत म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More