बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ बावनकुळेंना धक्का, दत्तक गावात काँग्रेसचा सरपंच!

नागपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही मोठा धक्का बसलाय. त्यांनी दत्तक घेतलेल्या सुरादेवी गावात काँग्रेसचे सुनील दुधपचारे सरपंचपदी विराजमान झालेत. 

राज्यात दुसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज लागत आहेत. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात राष्ट्रवादीचा सरपंच विराजमान झाल्याने त्यांच्यावर मोठी नामुष्की ओढवलीय. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांपाठोपाठ पालकमंत्र्यांनाही आपण दत्तक गाव न सांभाळता आल्याने राजकीय वर्तुळात या पराभवाची चांगलीच चर्चा रंगलीय. 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More