बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खडसे साहेब एखादा शूटर लावून मला मारुन तरी टाका”

जळगाव | महाविकास आघाडीच्या तीनचाकी सरकारमधील नेत्यांच्यात चालू असणारा अंतर्गत कलह आता हळूहळू समोर येऊ लागला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वाद पाहायला मिळत आहेत. अशातच आता जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद देखील चव्हाट्यावर आला आहे.

एकनाथ खडसे यांनी एका व्हायरल ऑडिओ क्लीपवरुन चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती. यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेत खडसेंना प्रत्युत्तर दिलं आहे. खडसे साहेब एखादा शूटर लावून मला मारुन तरी टाका, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, खडसे यांनी माझ्याबद्दल पातळी सोडून बोलू नये. त्यांनी पातळी सोडल्यास  मी देखील पातळी सोडून बोलेल. मी खडसे यांचा केव्हाच अनादर केला नाही. यामुळे त्यांनी देखील माझ्याबद्दल तोंडाला कुलूप लावावे.

तसेच व्हायरल ऑडिओ क्लीपसोबत खडसे माझं नाव जोडत आहेत. परंतु मी आणि माझे कुटुंब अगदी साधेपणाने जगतोय. खडसेंना माझ्याबद्दल काही वाटत असेल तर त्यांनी एखादा शूटर लावून मला मारुन टाकावे. मी आज देखील 10 वाजल्यानंतर घराला कुलूप लावून राहतो, ही परस्थिती आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘या’ गोळीने कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी झाला ;अमेरिकन कंपनीचा दावा

भारतीय रेल्वेने भंगार विकून कमावले कोट्यवधी रुपये; आकडा वाचून थक्क व्हाल

“अन्याय सहन करूनही फक्त पवारसाहेबांवर असलेल्या प्रेमापोटी राष्ट्रवादीबरोबर आहे”

महत्वाची बातमी! आता वाहनांची कागदपत्रे 31 ऑक्टोबरपर्यंतच वैध, वाचा सविस्तर

पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More