बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सांगलीचे पालकमंत्री बदला जिल्हा वाचवा’; निलेश राणेंचा जयंत पाटलांवर हल्लाबोल

मुंबई | केंद्रीय टीमने नुकताच सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये एक सर्व्हे केला आहे. त्यामध्ये या दोन जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करा, असा सल्ला केंद्रीय टीमने राज्य सरकारला दिला आहे. यावरूनच विरोधी पक्षनेत्यांनी सरकारवर निशाणा साधायला सुरूवात केली आहे.

अशातच भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी सांगलीचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. सांगली जिल्ह्यामध्ये पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री बदला आणि जिल्हा वाचवा, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

या संदर्भात निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी जयंत पाटील ज्यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मैदानात उतरले. त्यावेळी कोरोना आता आटोक्यात येणार अशा बातम्या सातत्यानं काही महिन्यांपूर्वी चालत होत्या. परंतू मागच्या महिन्यात सांगली जिल्ह्यामध्ये जो सर्वे झाला, त्यामध्ये पुन्हा सांगलीमध्ये लॉकडाऊन करवा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं, त्यांनी सांगितलं.

दरम्यान, केंद्रीय टीमने  कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमधील वाढती कोरोना रूग्णांची संख्या पाहूून चिंता व्यक्त केली आहे. तसेच कोरोना टेस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट टेस्टिंग आणि त्याचबरोबर कोरोनाप्रतिबंधक लसीकरण वाढवण्याचा सल्लाही केंद्रीय टीमने राज्य सरकारला दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“माफ करा तांत्रिक कारणामुळे आज इंधन दरवाढ झाली नाही; असुविधेसाठी दिलगीर आहोत”

‘सामना’वरुन घमासान; नाना पटोले आक्रमक… म्हणाले, सूर्यावर थुंकू नका!

राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; तब्बल इतक्या दिवसांपर्यंत पोलिस कोठडी

…अन् मला नग्न होण्यास सांगितलं, प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे कुंद्राच्या अडचणी वाढल्या

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटबाबत WHOचा सावधानतेचा इशारा!

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More