बिहार | सध्या बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. दरम्यान अनेक वादग्रस्त विधानं समोर येत असताना राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर चप्पल फेकण्यात आल्याची घटना घडली आहे.
बिहारमधील औरंगाबादमध्ये तेजस्वी यादव काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेसाठी गेले होते. यावेळी त्यांच्यावर चपलाने हल्ला करण्यात आला. या घटनेचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#WATCH Bihar: A pair of slippers hurled at RJD leader Tejashwi Yadav at a public rally in Aurangabad, today. pic.twitter.com/7G5ZIH8Kku
— ANI (@ANI) October 20, 2020
या व्हिडीओत एक चप्पल तेजस्वी यादव यांच्या बाजूने निघून जाताना दिसतेय. तर दुसरी चप्पल त्यांना लागली असल्याचं व्हिडीयोमध्ये दिसतंय. दरम्यान घटनेचा कोणताही परिणाम त्यांनी प्रचारावर होऊ दिला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
“उद्धव”ठाकरेंमध्ये दम नसता तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते”
3-4 रूपयांत उपलब्ध होणार मास्क, सरकारने जारी केला अध्यादेश
केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे 30 हजार कोटी द्यावेत- बाळासाहेब थोरात
…तर जग तुमची दखल घेतं; मनसेच्या मागणीला Amazon ने दिला प्रतिसाद