बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; चरणजीत सिंह चन्नी नवे मुख्यमंत्री

नवी दिल्ली |  पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यांनतर पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पंजाबाच्या मुख्यमंत्रिपदासाठी अंबिका सोनी, सुखजिंदर सिंह रंधावा या नेत्यांची नाव जोरदार चर्चेत होती. परंतु आज झालेल्या बैठकीत चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर अखेर काॅंग्रेस हायकमांडकडून मुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

काॅंग्रसेचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री होतील, असं सांगितलं आहे. त्याचबरोबर चन्नी हे सध्यांकाळी साडे सहा वाजता राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

काॅंग्रेस नेते सुखजिंदरसिंग रंधावा, नवज्योतसिंग सिद्धू, सुनिल जाखड, अंबिका सोनी, या नेत्यांची नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर होती. परंतु पंजाबमध्ये अनेक राजकीय घडामोडीनंतर हरीश रावत यांनी अखेर चरणजीत सिंह यांच्या नावाची घोषणा केली.

दरम्यान, पंजाबमध्ये काॅंग्रेस जातीय समीकरणाचे गणितं आखण्याचं प्रयत्न करीत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच पंजाबमधील इतर बड्या नेत्यांना डावलून पंजाबमधील दलित नेते चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाची संधी काॅंग्रेसकडून देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

आमची सत्ता आली तर…’; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

सुखजिंदर सिंग रंधावा पंजाबचे नवे मुख्यमंत्री?; थोड्याच वेळात घोषणा होण्याची शक्यता

“चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता”

भाजप नेते किरीट सोमय्या स्थानबद्ध???; देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटने खळबळ

‘डाॅल्फिनने माझ्यासोबत सेक्स केला अन् …’, महिलेने केला अजब खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More