बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या प्रकरणात न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निकाल

मुंबई | सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला आता आठ वर्ष उलटून गेले आहेत. मात्र, मारेकऱ्यांना अटक केली तरी सुत्रधार अद्यापही सापडले नाहीत. या प्रकरणाचा तपास केंद्रीय संस्था असलेली सीबीआय करत आहे.

डॉ. दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी पुण्याच्या विशेष न्यायालयात सुरू आहे. बुधवारी डॉ. दाभोळकरांच्या हत्या प्रकरणात पाच जणांवर न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. न्यायाधीश ए. आर. नवंदर यांनी पाच आरोपींवर आरोप निश्चीत केले आहेत. वीरेंद्रसिंह तावडे, शरद काळस्कर, विक्रम भावे, सचिन अंदुरे आणि संजीव पुनाळेकर यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

तावडे, भावे, काळस्कर आणि अंदुरे यांच्यावर आयपीसी कलम 302, 120 बी, 34 नुसार आरोप निश्चित केले आहेत. तर पुनाळेकरवर आयपीसी कलम 201 नुसार आरोप निश्चित केला गेला आहे. या प्रकरणावर पुढची सुनावणी 30 सप्टेंबरला होणार आहे.

दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मुलांनी तपासात दिरगांई होत असल्याचं म्हटलं होतं. या प्रकरणाचा तपास याआधी पुणे पोलीस त्यानंतर एटीएस आणि आता सीबीआय करत आहे.

थोडक्यात बातम्या –

भाजप यशापयशाची पर्वा न करता ओबीसी समाजाचेच उमेदवार देईल- देवेंद्र फडणवीस

गाडी वेगाने पळवताय सावधान! उच्च न्यायालयाने घेतलाय ‘हा’ मोठा निर्णय

आपली पोरं लय भारी! मराठमोळ्या अंदाजात मुंबई इंडियन्सचं नवं अँथम; पाहा व्हिडीओ

देशासह राज्यात घातपाताचा कट रचणाऱ्या संशयितांनी ‘या’ कॅम्पमधून घेतलं होतं प्रशिक्षण!

मेव्हणीसोबत पळाला, बायकोची आठवण आल्यावर तरूणाने केलं धक्कादायक कृत्य

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More