महाराष्ट्र मुंबई

अमिताभ बच्चन आणि केबीसीने महाराष्ट्राची बिनशर्त माफी मागावी- छत्रपती संभाजीराजे

मुंबई | अमिताभ बच्चन, केबीसी आणि सोनी टीव्हीला आवाहन करतो, की आपण महाराष्ट्राची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली आहे.

अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने संतापाची लाट उसळली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी ट्वीट करत अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीने माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

कोणत्याही महापुरुषांचा अपमानकारक उल्लेख कुणीही करू नये, तसं करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद करण्यात यावी, असा अध्यादेश सरकारने काढला पाहिजे, असंही संभाजीराजे म्हणाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एकेरी घेण्याइतपत आपण मोठे नाही आहात. परंतु देशात आजघडीला तुमच्या एकेक शब्दाला महत्व आहे, कारण लोक तुमचं ऐकतात, तुम्ही असं बोलणं योग्य नाही, असं म्हणत त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्या प्रकरणी अमिताभ बच्चन यांना सुनावलं आहे.

छत्रपती संभाजीराजे भोसले यांचं ट्वीट-

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या