बाळासाहेब असते तर कमळाबाईसोबतचे संबंध कधीच तोडले असते!

मुंबई | बाळासाहेब असते तर कमळाबाईसोबतचे संबंध कधीच तोडले असते, असा उपहासात्मक टोला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला लगावला आहे. ते मुंबईत बोलत होते. 

शिसेनेनं निर्णय घेण्याची वेळ आली आहे. अजून किती दिवस तळ्यात मळ्यात करणार. यासाठी निश्चित सीमा आहेत, असं त्यांनी म्हटलं. 

सरकारमध्ये राहून सरकारविरोधात भूमिका घेणं, असं होतं नसतं, असं त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, उद्धव ठाकरे सरकारवर कठोर टीका करतात. पण बाळासाहेब असते तर कमळाबाईसोबतचे संबंध कधीच तोडले असते, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-#MeToo | सलमान खानने माझा मानसिक छळ केला!

-#MeToo | आमिर खानचा मोठा निर्णय; त्या व्यक्तींसोबत काम करणार नाही!

-एसटी कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढवलेत की ते वेडे झालेत- दिवाकर रावते

-“खुद्द शरद पवार मोदींविरोधात बोलत नाहीत, कार्यकर्त्यांनी का न्यूनगंड बाळगायचा?”

-#MeToo | एका स्त्रीचा दुसऱ्या स्त्रीवर विनयभंगाचा आरोप