उदयनराजेंचा हटके अंदाज! हाती घेतलं रिक्षाचं स्टेअरिंग; पाहा व्हिडीओ
सातारा | खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलने नेहमीच चर्चेत असतात. कॉलर उडवण्याची पद्धत, बोलण्याची शैली यामुळे कार्यकर्त्यांमुळे प्रिय आहेत. चला हवा येऊ द्या, या कार्यक्रमामध्ये उदयनराजेंनी बाईकवरून हवेत इंट्री केली होती. त्यातच उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात रिक्षा स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उदयनराजेंनी रिक्षाच स्टेअरिंग हातात घेतल्याचं पहायला मिळालं.
उदयनराजे मित्र समुहाने ही स्पर्धा आयोजित केली होती. मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजेत्याचं उदयनराजेंनी पाठीवर थाप मारत कौतुक केलं आहे. सदर स्पर्धेत विजयी रिक्षा हाती घेत जलमंदिर परिसरात फेरफटका मारला.
उदयनराजे रिक्षा चालवतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता असल्याने उदयनराजेंचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. यावेळी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये उदयनराजे स्वत: रिक्षा चालवताना दिसत आहेत.
दरम्यान, उदयनराजे यांचा चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. उदयनराजेंनी बाईकवरून अनोखी एंट्री केली होती. यावेळी निलेश साबळे यांनी पुष्पामधील डायलॉग बोलून दाखवण्याची विनंती केली होती. पुष्पा झुकेगा नहीं साला म्हणत उदयनराजेंनी स्टाईल देखील करून दाखवली होती.
पाहा व्हिडीओ-
खासदार उदयनराजे भोसले यांनी हाती घेतलं रिक्षाचं स्टेअरिंग! ‘जलमंदिर’ परिसरात मारला फेरफटका @Chh_Udayanraje @BJP4Maharashtra @SataraPolice #UdayanrajeBhosle #satara #BJP pic.twitter.com/gyqDlqX18d
— Sagar P. Joshi (@spjoshi11) March 1, 2022
थोडक्यात बातम्या-
“प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा आणि मते मिळवायची, असं हे भाजपचं राजकारण”
“पंतप्रधानांवर टीका करण्यासाठी तुमची तेवढी लायकी असली पाहजे”
ज्याची भीती होती शेवटी तेच झालं; रशियाने केलेल्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
युक्रेनमधील भारतीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
निलेश राणेंच्या नव्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ, म्हणाले…
Comments are closed.