देश

छत्तीसगडमध्येही भाजपचं पानीपत होणार, काँग्रेस सत्तेवर येणार!

नवी दिल्ली | एबीपी-सी व्होटरच्या ओपिनियन पोलनं भाजपमध्ये खळबळ उडवून दिली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे छत्तीसगडमध्ये देखील भाजपच्या पराभवाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

छत्तीसगडमध्ये एकूण 90 जागांपैकी काँग्रेसला 54, भाजपाला 33 आणि अन्य पक्षांना 3 जागा मिळण्याचा अंदाज आहे.  मतांच्या टक्केवारीत काँग्रेसला 40 आणि भाजपाला 39 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी 34 टक्के लोकांनी रमण सिंह यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेले अजित जोगी यांना मुख्यमंत्रिपदासाठी 17 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. पंतप्रधानपदासाठी 56 टक्के लोकांनी मोदींना तर आणि 21 टक्के लोकांनी राहुल गांधींना पसंती दर्शवली आहे.

इतर राज्यांमध्ये काय स्थिती?

-राजस्थानमध्ये होणार भाजपचा सर्वात धक्कादायक पराभव?, पाहा आकडे…

-मध्य प्रदेशमध्ये भाजपचा टांगा पलटी होणार?, शिवराज सरकार कोसळण्याचा अंदाज!

-भाजपला मोठा धक्का; मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभव होणार!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या