लातूर | मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेने दिला आहे. लातूरमधील पत्रकार परिषदेत नानासाहेब जावळे यांनी ही घोषणा केली.
सभागृहात मुद्दा मांडण्याऐवजी मराठा आमदारांनी राजीनाम्याचे स्टंट करु नयेत. एवढीच कळकळ असेल तर मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर उपोषण करावं, असं ते म्हणाले.
दरम्यान, चर्चा बिर्चा काही नाही आधी आरक्षण द्या आणि नंतर चर्चा करा, असं ते म्हणाले. तसेच शरद पवारांनी ठाम भूमिका घ्यावी, वेळोवेळी भूमिका बदलू नये, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-नरेंद्र मोदींच्या एका सहीने आयुष्य पालटलं; तरुणीला लग्नाच्या अनेक मागण्या
-राम मंदिराच्या विटांचं काय झालं?; राज ठाकरेंचा भाजपला सवाल
-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव केंद्रात मांडा; राजनाथ सिंहांचा मुख्यमंत्र्यांना आदेश
-मराठा आरक्षणासाठी चक्क दलित आमदाराचा राजीनामा!
-मराठा आरक्षणासाठी साताऱ्यातील पहिला राजीनामा…