बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदी सरकारने मांडलेल्या बजेटवर पी. चिदंबरम यांची सडकून टीका

नवी दिल्ली | माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

मोदी सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने अर्थव्यवस्था रूळावर आणण्याची आशाच सोडली असल्याचं सिद्ध होतंय, असं पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. ते दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मी पहिल्यांदाच सर्वात मोठं भाषण ऐकलं. या भाषणातून 2020-21 साठी काय संदेश द्यायचा होता. हे मला कळलं नाही. या भाषणात मला कोणताही अविस्मरणीय विचार किंवा घोषणाही दिसली नाही, अशी टीका चिदंबरम यांनी केली.

दरम्यान, अर्थव्यवस्था संकटात आहे हे सरकारने मान्य केलं आहे. मात्र अर्थव्यवस्था सुधारण्यावर त्यांचा विश्वास नाही, असंही चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

देशाचं विभाजन करत असलेलं राजकारण थांबवा- सोनम कपूर

तहसीलदारबाई हिरोईनसारख्या दिसतात म्हणणाऱ्या लोणीकरांची सारवासारव, म्हणतात…

महत्वाच्या बातम्या- 

लोणीकरांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, ‘ते’ वक्तव्य आक्षेपार्हच- चित्रा वाघ

मराठा तरुणांंचा ‘मातोश्री’बाहेर आत्मदहनाचा इशारा

“शून्याचा शोध आर्यभट्टने लावला अन् लोकांच्या हाती शून्य देण्याचा इतिहास भाजपच्या नावावर”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More